Ad will apear here
Next
नारळ प्रक्रिया उद्योग अभ्यासासाठी युवा शेतकऱ्यांच्या केरळ सहलीचे आयोजन
कोचीतील कोकोनट डेव्हलपमेंट बोर्ड आणि कासारगोड येथील ‘सीपीसीआरआय’ संस्थेला भेट


पुणे/रत्नागिरी :
कोकणामध्ये नारळावर आधारित प्रक्रिया उद्योगाला मोठी व्यावसायिक संधी आहे. नारळ प्रक्रिया प्रकल्पासाठी कोकोनट डेव्हलपमेंट बोर्डाकडून ४० टक्क्यांपर्यंत अनुदान दिले जाते. शेतकरी उत्पादक संस्थांनाही केंद्र सरकार प्रोत्साहन देत आहे. या पार्श्वभूमीवर, कोकणातील युवक, युवती, शेतकरी, उद्योजक, व्यापारी आदींसाठी, तसेच कोकणाबाहेरील इच्छुकांसाठी केरळमध्ये अभ्यास सहलीचे आयोजन करण्यात आले आहे.

विश्व मराठी परिषदेतर्फे या सहलीचे आयोजन करण्यात आले असून, ही सहल रत्नागिरीतून १२ फेब्रुवारी २०२०ला निघून १५ फेब्रुवारी २०२० रोजी रत्नागिरीत परत येणार आहे. पुणे येथील प्रा. क्षितिज पाटुकले यांनी रत्नागिरी येथील दीपक पटवर्धन, गजानन पाटील, तुषार आंग्रे, कोल्हापूर येथील नंदकुमार दिवटे आणि वेंगुर्ला येथील ‘व्हीसीओ’ उत्पादक अभिजित महाजन यांच्या सहकार्याने ही अभ्यास सहल आयोजित केली आहे. अभ्यास सहलीदरम्यान केंद्र सरकारचे कृषी निर्यात सल्लागार डॉ. सागर पाटील उपस्थित राहणार आहेत. 



‘यामध्ये फक्त कोकण आणि गोवा येथीलच व्यक्तींनी सहभागी व्हायचे असे नसून, मुंबई, पुणे, महाराष्ट्र, गोवा आणि विदेशातूनही ज्यांना उद्योजकतेमध्ये आणि कोकण विकासामध्ये रुची आहे, अशा सर्वांचे स्वागत आहे,’ असे आयोजकांतर्फे कळवण्यात आले आहे. ‘लवकरच फार्मर प्रोड्युसर कंपनी स्थापून पहिला प्रकल्प दसऱ्यादरम्यान सुरू करण्याचा मानस आहे. भविष्यात कोकणामध्ये प्रत्येक तालुक्यात एक प्रकल्प अशी कल्पना आहे,’ असे आयोजकांनी म्हटले आहे. 



नारळावर प्रक्रिया करून तयार केलेले व्हर्जिन कोकोनट ऑइल (व्हीसीओ), डेसिकेटेड कोकोनट, कोकोपीट, कोकोनट शुगर, कोकोनट वेफर्स इत्यादी उत्पादनांना जगभर प्रचंड मागणी आहे. विशेषतः ‘व्हीसीओ’ला आईच्या दुधाच्या बरोबरीने मान्यता असून कॅन्सर, रक्तदाब, अल्सर, अल्झायमर, त्वचा विकार इत्यादी अनेक आजारांवर व्हीसीओ अत्यंत उपयुक्त औषध आहे. याचबरोबर मधुमेहावर अत्यंत उपयुक्त अशा कोकोनट शुगरला वाढती मागणी आहे. नारळ प्रक्रिया उद्योगामध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मितीची संधी आहे. नारळापासून तयार होणारी सर्व उत्पादने सेंद्रिय असून, कोणताही रासायनिक पदार्थ त्यामध्ये समाविष्ट करावा लागत नाही. नारळाचे वेफर्स अत्यंत चविष्ट असून, पौष्टिक व जीवनसत्त्वयुक्त आहेत. नारळापासून चॉकलेट, बिस्किटेही बनवता येतात. नारळ प्रक्रिया उद्योग कोकणचा चेहरामोहरा बदलून टाकू शकेल. ही उत्पादने आता अमेझॉन/फ्लिपकार्टवर थेट ग्राहकांना विकण्याचीही सोय आहे. 



अभ्यास सहलीदरम्यान काय पाहता येईल?
- नारळ प्रक्रिया प्रकल्प पाहता येतील. यामध्ये व्हीसीओ, डेसिकेटेड कोकोनट, नारळाचे वेफर्स, नारळ शुगर, कोको क्रीम, बिस्किटे, निरा ज्यूस तयार करायचे युनिट पाहता येईल.

- नारळाच्या झाडावर सहजपणे चढता येईल अशी शिडी पाहता येईल.

- नारळावर सहजपणे चढणारी पेट्रोलवर चालणारी बाइक पाहता येईल.

- नारळ नर्सरी, मिश्र लागवडीचे प्रयोग पाहता येतील.

- कोकोनट बोर्ड, केंद्र सरकार यांच्या योजनाची माहिती मिळेल.

- फार्मर प्रोड्युसर कंपनी कशी स्थापन करायची याची माहिती मिळेल.

- हवेशी संपर्क येऊ न देता निरा गोळा करायच्या आधुनिक तंत्राची माहिती मिळेल.

- जुलै २०२०मध्ये मलेशियात क्वालालंपूरमध्ये होणाऱ्या आशिया पॅसिफिक कोकोनट कॉन्फरन्सला फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या सदस्यांना उपस्थित राहता येईल. तेथे जाण्या-येण्यासाठी बोर्ड अनुदान देते. 

अधिक माहितीसाठी संपर्क : 
उल्का दिवटे, कोल्हापूर : ९८५०५ ५६५०७
तुषार आग्रे, रत्नागिरी : ८००७० ८८९७२
प्रा. क्षितिज पाटुकले, पुणे : ९८२२८ ४६९१८



नारळाच्या करवंटीपासून तयार केलेल्या शोभिवंत वस्तू

कोकोनट शुगर
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/HZQUCI
Similar Posts
‘उच्च शिक्षणासाठी सामाजिक संस्थांचा हातभार महत्त्वाचा’ पुणे : ‘शेतीविषयक शिक्षणामध्ये नाविन्यपूर्ण बदल केले जात आहेत. सरकारनेही चांगल्या योजना निर्माण केल्या आहेत. शिवाय, आपल्याकडे बहुतांश विद्यार्थी मुख्य व्यवसाय शेती असलेल्या भागातून येतात. मात्र, आर्थिक पाठबळाच्या अभावामुळे त्यांना उच्च शिक्षण घेण्यात अडचणी येतात. अशावेळी सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या
आंतरराष्ट्रीय विज्ञानपट महोत्सवात पुणेकर ‘कस्तुरी’च्या यशाचा दरवळ पुणे : दहावीत शिकणाऱ्या कस्तुरी कुलकर्णीने बनवलेल्या ‘सिंबायोसिस’ या लघुपटाला ‘इंटरनॅशनल सायन्स फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया’मध्ये तृतीय पुरस्कार मिळाला आहे. कस्तुरी ‘बेरीज वजाबाकी’ या मराठी चित्रपटाची सहाय्यक दिग्दर्शकसुद्धा आहे.
राजगडाच्या पायथ्याशी मिळणार शेतकऱ्याच्या घरात राहण्याचा आनंद पुणे : खेडेगाव, शेती, शेतकरी याविषयी शहरी भागातील लोकांना कुतूहल असते. शहरी वातावरणापासून दूर, अस्सल गावरान आणि मोकळ्या हवेचा आनंद घेण्यासाठी शहरातील मंडळी आसुसलेली असतात. आता राजगडाच्या पायथ्याशी असलेल्या गावात हा आनंद अनुभवता येणार आहे.
लॉकडाउनने दाखवला केळी प्रक्रिया उद्योगाचा मार्ग; विद्यार्थ्यांचाही सहभाग सोलापूर : स्वतः कष्टाने पिकविलेला शेतीमाल शेतात वाया जाऊ नये म्हणून रोपळे (ता. पंढरपूर, जि. सोलापूर) येथील शेतकऱ्यांनी कलिंगडे, केळी परिसरातील कुटुंबांना दान केली. कच्च्या केळ्यांचा योग्य प्रकारे वापर होण्यासाठी त्यावर प्रक्रिया करून विविध पदार्थ तयार करण्याचा उपक्रम सध्या या भागात राबविला जात आहे. विशेष

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language